स्वच्छता सायकल रॅलीचा
शुभारंभ
नांदेड दि. 26 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पनेतून चालवण्यात येत असलेली स्वच्छता
अभियान 2 ऑक्टोबर 2014 ते
2 ऑक्टोबर
2019 ला पाच वर्षे पुर्ण होत
आहे. यानिमीत दिल्ली येथे 2 आक्टोबर 2019 रोजी
महोत्सवाचे आयोजन केले आहे.
52 महाराष्ट्र बटालियन
एनसीसी नांदेडचे कमाडिंग अधिकारी कर्नल जी.आर.के. शेषा साई यांच्यामार्फत होत असलेल्या
सायकल रॅलीचा शुभारंभ येथील पोलिस परेड
मैदानावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते ध्वज दाखवून आज 26
ऑगस्ट करण्यात आला. यावेळी नांदेड पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते. या रॅलीसाठी नांदेड
येथील बटालियन येथील 650 छात्रसैनिक व एनसीसी
अधिकारी उपस्थित होते.
महासंचालक राष्ट्रीय छात्र सेना दिल्ली यांच्या आदेशानुसार भारतातील सर्व राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना संचालनालय अंतर्गत स्वच्छता सायकल रॅलीचे आयोजन होत आहे. एक
रॅली पुडूचेरी पासुन तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
राज्यातून व दुसरी
रॅली केरळ व कर्नाटक राज्यातून लातूर
येथील 53 महाराष्ट्र बटालियन
एनसीसी लातूर येथुन या दोन्ही
सायकल रॅली बॅटन घेऊन
25 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी नांदेड
येथे पोहोचली व या दोन्ही
बॅटन एनसीसी संचालनालय महाराष्ट्र राज्य
मुंबई यांच्या औरंगाबाद ग्रुप अंतर्गत येणा-या 52 महाराष्ट बटालियन एनसीसी नांदेड
यांच्या सुपूर्द करतील. अशाप्रकारे बाकी सर्व राज्यातुन छात्रसैनिक बॅटन घेऊन या
महोत्सवात पोहोचतील व 2 ऑक्टोबर
2019 रोजी होणा-या कार्यक्रमात सहभागी होतील.
सोमवार 26
ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस
कवायत मैदानामध्ये 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड जिल्हयातील सर्व छात्र
सैनिक एकत्र आले होते. या बटालियनचे
छात्र सैनिक या दोन्ही बॅटन घेउन
सायकलवर प्रवास करीत आसना पूलापासुन
वारंगा फाटा येथे
पोहोचुन वारंगा फाटा
येथे रात्री मुकामी थांबतील. 27 ऑगस्ट
2019 वारंगा फाटा ते हदगाव येथे
मुक्कामी असेल. हदगावहुन
28 ऑगस्ट 2019 रोजी
सवाना पोहोचुन महाराष्ट्र राज्य संचालनालयाच्या अन्य एनसीसी ग्रुप हेड
क्वॉर्टर अमरावती ग्रुपला हे बॅटन सुपूर्द
करतील. जे पुढे नागपुर
ग्रुप येथे देऊन मध्यप्रदेश
व छत्तीसगड राज्याच्या एनसीसी संचालनालयास सुपूर्द करतील. अशाप्रकारे पुढे जात
छात्रसैनिकाद्वारे 2 ऑक्टोबर 2019 च्या
अगोदर दिल्ली येथे पोहोचतील.
या सायकल रॅलीमध्ये
मार्गातील येणा-या गावामध्ये जाऊन छात्रसैनिक
स्वच्छतेचा संदेश त्याचबरोबर, बेटी बचाओ, बेटी पडाओ, संसर्गजन्य आजारावर माहिती,
आपला परीसर स्वच्छ ठेवणे, कौशल्य भारत,
कुशल भारत, खुले शौच
टाळा, प्रौढ शिक्षा, बनावट मद्य
व अंमली पदार्थ या विषयावर लोकांमध्ये जनजागृती
करत आहेत.
00000
No comments:
Post a Comment