Monday, August 26, 2019


शांतता समितीची बैठक संपन्न
            नांदेड दि. 26 :- आगामी काळातील सण उत्‍सव शांततेत पार पडावेत यादृष्‍टीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना अनुषंगाने श्री गणेशोत्‍सव व मोहरम (ताजिया) सण / उत्‍सव अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार 23 ऑगस्‍ट, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे संपन्न झाली.
जिल्ह्यात दिनांक 2 सप्टेंबर 2019 रोजी 'श्रीं' ची स्थापना होऊन गणपती उत्सवास सुरुवात होत आहे. दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजी अनंत चतुर्दशी दिवशी 'श्रीं' चे विसर्जन होणार आहे. दरवर्षी हा उत्‍सव नांदेड शहर व जिल्‍ह्यात सर्वत्र मोठ्या उत्‍साहाने साजरा होत असतो. गणेश उत्‍सवाचे महत्‍व लक्षात घेता, तसेच उत्‍सव शांततेत पार पडावा आणि जिल्‍ह्यात सर्वत्र कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी म्‍हणून जिल्‍हा प्रशासनामार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत असते. याच कालावधीत दिनांक 1ते 10 सप्टेंबर 2019 या कालावधीत मोहरम (ताजिया) हा सण साजरा होत आहे. तसेच 30 ऑगस्ट 2019 रोजी पोळा आदी सण / उत्‍सव साजरे होणार आहेत.
            सण उत्सव शांततेत पार पडावेत या दृष्‍टीकोणातून जिल्‍हा प्रशासनामार्फत खालील प्रमाणे उपाय योजना करण्‍यात आल्‍या व त्याअनुषंगाने विविध सूचना देण्यात आल्या.
1.
गणेशोत्‍सव कालवधीत (श्री स्‍थापने पासून ते श्री विसर्जनापर्यन्‍त) शांतता अबाधीत रहावी म्‍हणून जिल्‍ह्यातील सर्व उप विभागीय दंडाधिकारी आणि सर्व तालुका दंडाधिकारी यांना आवश्‍यक त्‍या खबरदारीच्‍या उपाययोजना करण्‍यास सविस्‍तर सूचना दिल्‍या आहेत.
2.
तालुका मुख्यालयी/नगरपालिका मुख्‍यालयी तसेच संवेदनशील गांवी ठिकाणी शांतता समितीच्‍या बैठका आयोजीत करण्‍यास सर्व उप विभागीय दंडाधिकारी आणि सर्व तालुका दंडाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
3.
श्री उत्‍सव/मोहरम कालावधीत विद्युत पुरवठा अखंडीत ठेवणे(लोडशेडींग बंद करणे), तालुका ठिकाणी सब स्‍टेशन निहाय विशेष पथक नेमणे,प्रत्‍येक डी.पी. च्‍या ठिकाणी लाईनमनचे पथक नेमण्‍यासाठी अधीक्षक अभियंता,म.रा.वि.वि.कं नांदेड व जिल्‍ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. नांदेड यांना सूचना दिल्‍या आहेत.
4.
गणेशोत्‍सव/मोहरम व इतर सण/उत्‍सव कालावधीत खालील प्रमाणे कार्यवाही करण्‍या च्‍या सूचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड, आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर मनपा नांदेड, सर्व मुख्‍याधिकारी न.प.नांदेड जिल्‍हा व सर्व गट विकास अधिकारी नांदेड जिल्‍हा यांना दिल्‍या आहेत.

1.
मुख्‍य मार्गावरील तसेच शहरातील बंद असलेले सर्व विद्युत दिवे / फोकस चालु करणे.

2.
रस्‍त्‍यावरील खचखळगे दुरुस्‍त करणे, मिरवणूक मार्गावरील अडथळे व बांधकाम साहित्‍य हटविणे.

3.
मोकाट जनावरांचा बंदोबस्‍त करणे.

4.
अग्‍नीशमन दल, वाहन चालकासह सुसज्‍ज ठेवणे.

5.
विसर्जनाच्‍या ठिकाणी घाटांची दुरुस्‍ती करणे, विद्युत दिवे व फोकस बसविणे आणि घाटांवर जिवनरक्षक पथक तैनात करणे.
5.
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक नांदेड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी नांदेड आणि अधिष्‍ठाता, डॉ.शंकरराव चव्‍हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड यांना उत्‍सव कालावधीत तातडीची वैद्यकीय सेवा, राखीव औषधी साठा व विविध गटांचा रक्‍त साठा आणि रुग्‍नालयामध्‍ये खाटा राखीव ठेवण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.
6.
विसर्जन मिरवणूकीत वापरण्‍यात येणा-या वाहनांची तपासणी करुनच परवानगी देण्‍याच्‍या सूचना पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्‍या आहेत. तसेच यासाठी नांदेड शहरासाठी प्रादेशीक परिवहन अधिकारी व तालुका मुख्‍यालय ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळ आणि यांत्रिकी विभागांना कार्यवाही करण्‍याच्‍या  सूचना दिल्‍या आहेत.    
7.
श्री उत्‍सव काळात गणेश मंडळाकडून करण्‍यात येणा-या महाप्रसादाची व श्री उत्‍सवामध्‍ये वापरण्‍यात येणा-या गुलालाची तपासणी करावी,तसेच भेसळयुक्‍त  गुलाल विक्री करण्‍या-या विक्रेत्‍यावर कार्यवाही करावी अशा सुचना सहाय्यक आयुक्‍त, अन्‍न व औषध प्रशासन, नांदेड यांना दिल्‍या आहेत.
8.
सण/उत्‍सव कालावधीत अतीसंवेदनशील व संवेदनशील गावी/ठिकाणी संपर्क   अधिका-यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍याच्‍या सूचना सर्व तालुका दंडाधिकारी यांना दिल्‍या  आहेत.
9.
जिल्‍ह्यातील तालुका मुख्‍यालयी सण/उत्‍सव कालावधी दरम्‍यान नियंत्रण कक्ष स्‍थापन करुन तो 24 तास कार्यरत राहील याची दक्षता घेणेस सर्व उप विभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांना सूचना दिल्‍या आहेत.

सार्वजनिक गणपती मंडळांच्‍या संयोजकांनी खालील सूचनांचे काटोकोरपणे पालन करावे.
1.
श्री स्‍थापने पूर्वी गणेश मंडळाच्‍या संयोजकांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त, नांदेड आणि संबंधीत पोलीस स्‍टेशनकडून रितसर परवानगी घ्‍यावी. विना नोंदणी व विना परवाणगी सार्वजनिक गणपती मंडळाने स्‍थापना करु नये.
2.
श्री मुर्तीची स्‍थापना सार्वजनीक रस्‍त्‍यावर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अश्‍या ठिकाणी करु नये.
3.
श्री स्‍थापनेची जागा आणि परिसर स्‍वच्‍छ असावा. त्‍या ठिकाणी प्रकाशाची भरपूर सोय केलेली असावी.
4.
श्री मुर्तीच्‍या संरक्षणाची जबाबदारी संबंधीत मंडळाचे अध्‍यक्ष आणि पदाधिका-यांवर सोपविण्‍यात यावी. श्री स्‍थपनेच्‍या ठिकाणी या साठी 24 तास कार्यकर्त्‍यांची चक्राकार पध्‍दतीने नियुक्‍त्‍या कराव्‍यात.
5.
उत्‍सव कालावधीत वापरण्‍यात येणा-या ध्‍वनिक्षेपकाची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन येथुन घ्‍यावी. ध्‍वनीक्षेपकाच्‍या आवाजामुळे रुग्‍णास, विद्यार्थ्‍यांस व परिसरातील सर्वसामान्‍य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
6.
गणेश मंडळाकडून दाखवण्‍यात येणा-या देखाव्‍यामुळे इतर धर्मियांच्‍या भावना दुखवल्‍या जाणार नाहीत असेच देखावे उभे करावेत. देखावे उभारण्‍यापुर्वी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून परवानगी घ्‍यावी.
7.
गणेश मंडळातर्फे आयोजीत करण्‍यात येणा-या मनांरेजन व सांस्‍कृतीक कार्यक्रमांची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून घ्‍यावी.
8.
विसर्जन मिरवणूकीत वापरात येणारी वाहने चांगली व सुस्थितीत असावी. त्‍याची तपासणी नांदेड शहरासाठी प्रदेशिक परिवहन अधिकारी नांदेड व तालुक्‍याच्‍या ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळ आणि यांत्रिकी विभागांची मदत घ्‍यावी.
9.
सर्व महसूल अधिकारी व पोलीस अधिका-यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रा मध्‍ये  शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधीत ठेवण्‍यासाठी एन.सी.सी., स्‍काऊट गाईड, होमगार्ड तसेच शांतता समितीच्‍या सदस्‍यांची मदत घ्‍यावी.उत्‍सव कालावधीत श्री च्‍या स्‍थापने पासून ते श्री च्‍या विसर्जनापर्यन्‍त साज-या होणा-या सर्व कार्यक्रमामध्‍ये त्‍यांना सहभागी करुन घेवून कायदा व सुव्‍यवस्‍था परिस्थिती हाताळावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...