Wednesday, January 2, 2019


भारत निवडणूक आयोगाचा
राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 
नांदेड दि. 2 :-   भारत निवडणूक आयोग यांनी सन 2012 ते सन 2018 दरम्यान मतदार शिक्षण व जनजागृतीच्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट मोहिम राबविण्यासंबंधाने राष्ट्रीय माध्यम पुरस्कार देण्यास्तव चार प्रकारच्या श्रेण्यांमध्ये नामांकने मागविली आहेत. यात प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक (टेलिव्हीजन) मिडीया, ईलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मिडीया, ऑनलाईन (इंटरनेट) / सोशल मिडीया ही नामांकने विशेष योगदानाच्या संपूर्ण माहितीसह मा. निवडणूक आयोगाकडे सादर करावयाची आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000 


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1236 तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला   राष्ट्रीय दुःखवटयामुळे माळेगाव यात्रेतील डॉ.शंकरराव चव...