राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
यांच्या हस्ते
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण
नांदेड दि. 03 :- क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने
आयटीआय चौक येथे उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राजस्थानचे मुख्यमंत्री
अशोक गेहलोत यांच्या हस्ते झाले .
यावेळी खा. अशोकराव चव्हाण,
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर ,
आ. अमरनाथ राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर,
आ. विक्रम काळे, आ. डी . पी. सावंत,
महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे,
पोलीस अधीक्षक संजय जाधव, नांदेड वाघाळा शहर
महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
म्हणाले की,
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे
सामाजिक विषमता व समाजातील भेदभाव दूर करण्याचे काम अतूलनीय आहे. तसेच शैक्षणिक
सुधारणांच्या कार्यातही त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.
खा. अशोकराव चव्हाण
म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांनी समाजाला पुढे आणण्याचं काम केले आहे. क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळेची दारे उघडून दिली. त्यामुळे मुलींना
स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.असे सांगून नांदेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा
प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
आ. डि . पी. सांवत
म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा उभा केल्याने नांदेडच्या वैभवात नवी भर
पडली आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा पुढे चालू आहे. या पुतळ्यांचे महत्व
नांदेड शहरासाठी व आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे.
आ. विक्रम काळे म्हणाले की,
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाज
कार्य आणि समाज कार्यातील योगदान महत्वाचे आहे,
या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन प्रा. संतोष देवराय यांनी केले तर प्रास्ताविक मनपा आयुक्त लहुराज
माळी यांनी केले. यावेळी विनय पाटील, सोनाळे दुष्यंत गणेशराज,
स्थायी समिती सभापती खान फारुखअली इलयाज खॉ, प्राशिमबाक
समितीच्या सभापती सौ. संगीता तुप्पेकर , सौ. गुरुप्रितकौर
सोडी, प्राशिमबाक समितीच्या उपसभापती सौ. अलका शहाणे,
सौ. मोहिनी येवनकर, नगरसवेक गड्डम नागनाथ
दत्तात्रय आदि मान्यवर तसेच नांदेड परिसरातील नागरिक, पदाधिकारी
यांची यावेळी उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment