Thursday, January 3, 2019


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 साठी
फळबाग लागवडीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ  

नांदेड दि. 03 :-  महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेअंतर्गत केवळ जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनु.जाती, जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता 2 हे क्षेत्र मर्यादेपर्यंतअनुदानास पात्र असत. राज्यामध्ये 80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असुनही त्यांचेकडे जॉबकार्ड नसल्याने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते.या पार्श्वभूमिवर सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ही नविन योजना राज्यात लागू करण्यात आली. लागवडीचा कालावधी प्रतिवर्ष माहेमेत नोव्हेंबरपर्यंत राहील असे नमुद करण्यात आलेले आहे.
तथापि यावर्षी दुष्काळ सदृष्यपरिस्थतीत असल्यामुळे तसेच योजनेची अंमलबजावणी होण्यास विलंब झाल्यामुळे विहीत कालावधीत फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही.
त्यामुळे सदर योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची विनंती कृषि आयुक्तालयाकडून शासनास करण्यात आली होती.   
सदर बाब विाचारात घेऊन फळबाग लागवड करण्याची मुदत शासन निर्णय क्रमांक-राफयो-2018/प्र.क्रं.47/भाग-4/9-अे/ मंत्रालय,मुंबई दिनांक  28 डिसेंबर 2018 अन्वये दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.

0000000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...