Thursday, January 3, 2019


गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक यांचे
एक दिवसीय जिल्हा स्तरीय प्रशिक्षण येथे संपन्न

नांदेड, दि. 3 :- नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (POCRA) अंतर्गत दुस-या टप्प्यात निवडण्यात आलेल्या 15 तालुक्यातुन 215 गावातील सरपंच,ग्रामसेवक,कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक यांचे एक दिवसीय प्रकल्पाची तोंड ओळख रुपरेषा विषयाचे प्रशिक्षण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उत्साहात संपन्न झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रतापपाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,यशदाचे तज्ञ प्रशिक्षक 215 गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक तसेच जिल्हातील उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे यांनी प्रस्ताविका मध्ये प्रकल्पाची रुपरेषा, ग्रामसंजिवनी समितीची रचना, जबाबदाऱ्या कार्ये प्रकल्पाची सर्वसाधारण कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन केले.
आमदार  प्रतापपाटील चिखलीकर यांनी उपस्थित सरपंचाना प्रकल्पामध्ये निवड झालेली ही संधी समजुन प्रकल्पाची अंमलबजावनी व्यवस्थितरित्या करुन गावाचा शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करणे बाबतही अवाहन केले.
जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे यांनी प्रकल्पाअंतर्गत राबवायच्या बाबीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड,रेशीम उद्योग,कुकुटपालन,शेळीपालन,नियंत्रित  शेती, शेततळे अशा इतर वैयक्तिक लाभाच्या बाबी सामुदायिक बाबीचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले.
यशदा पुणे येथील तज्ञ प्रशिक्षक जयदेव शंकर रांजनकर यांनी प्रकल्प संकल्पना घटक आणि दुरदृष्टीकोन,सुक्ष्मनियोजन  सविस्तर प्रकल्प आराखडा बाबत मार्गदर्शन केले यशदाचे तज्ञ प्रशिक्षक राजेश बाबाराव भटकर यांनी ग्राम कृषि संजिवनी समिती स्थापना, भुमीका आणि जबाबदारी वैयक्तिक घटकाचा लाभ देणे पध्दती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मान्यवारांच्या उपस्थितीत 5 शेतकरी गटांना गट शेती प्रोत्साहन योजनेअंतर्गत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि उपसंचालक सौ. माधुरी सोनवणे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.व्ही.आकोलकर प्रकल्प विशेषज्ञ (कृषि) नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प जिल्हास्तरीय समितीचे कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...