Thursday, October 25, 2018


ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या
नोंदणीकृत संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- महाराष्‍ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम, 1992 मधील परिच्‍छेद 7 नुसार राज्‍य शासनाकडुन सहाय्यक अनुदान वितरीत करण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणा-या, परंतु ग्राहक चळवळ, ग्राहक व ग्राहक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण व  संवर्धनाचे कार्य करणा-या नोंदणीकृत संस्‍थांकडून अर्ज मागविण्‍यात येत आहे.
यासंदर्भात या विभागाच्‍या दिनांक 26 जुलै, 2017 च्‍या शासन निर्णयानुसार, ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणा-या ग्राहक संस्‍थां व्‍यतिरिकत इतर क्षेत्रात काम करणा-या परंतु ग्राहक चळवळीचे ही कार्य करणा-या नोंदणीकृत सस्‍थांना शासनाकडुन अनुदान वितरीत करण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहे.  विहित अर्जाचा नमुना शासन निर्णय महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
अर्ज करणा-या इच्‍छुकांनी विहीत नमुन्‍यातील त्‍यांचा प्रस्‍ताव 30 दिवसाच्‍या आत नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेपुर्वी किंवा त्‍यापुर्वी प्राप्‍त होतील असा सादर करावा. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या अर्जाचा व विचार केला जाणार नाही, याची नोंद संबंधितांनी घ्‍यावी. तसेच यामध्‍ये बदल करण्‍याचे सर्व अधिकार अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राखून ठेवले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...