Thursday, October 25, 2018


दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
नांदेड दि. 26 :- दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन 29 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने 20 ऑक्टोंबर 2018  रोजी काढले आहे. दिलेल्या सुचनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे.
राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
           या सप्ताहाच्या अनुषंगाने विशेष पुस्तिका प्रकाशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक यांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या www.cvc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध साहित्याचा जनतेमध्ये वितरणासाठी उपयोग करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना या सप्ताहाच्या निमित्ताने देण्यात आल्या आहेत.
विभाग प्रमुखांनी परिपत्रकात दिलेल्या सुचनानुसार अधिनस्त सर्व कार्यालय प्रमुखाना सुचना देण्यात याव्यात तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...