Thursday, October 25, 2018


भूजल अधिनियमानुसार जिल्ह्यातील
401 गावे संभाव्य पाणी टंचाईग्रस्त जाहीर
नांदेड दि. 25 :-  महाराष्ट्र भूजल अधिनियम (विकास व व्‍यवस्‍थापन) अन्‍वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील 401 गावे / वाडया / तांडया येथेभाव्‍य पाणी टंचाईग्रस्‍त म्‍हणून जाहीर केले आहे. याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे.
वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नांदेड यांनी सप्‍टेंबर 2018 अखेर पर्यंत झालेल्‍या पर्जन्‍यमान व त्‍यामुळे निरिक्षण विहीरीच्‍या स्थिर पाण्‍याच्‍या पातळीतील फरक यांचा तुलनात्‍मक आभ्‍यास करुन त्‍यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. यानुसार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील 401 गावे, वाडया, तांडयामध्‍ये सद्यस्थितीत पाणीटंचाई भासण्‍याची शक्‍यता आहे.
या अहवालानूसार महाराष्ट्र भूजल अधिनियम (विकास व व्‍यवस्‍थापन) 2009 चे कलम 20, 25 व 26 अन्‍वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील 401 गावे / वाडया / तांडया येथेभाव्‍य पाणी टंचाईग्रस्‍त म्‍हणून जाहीर केले आहे.
अहवालानुसार तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याची सद्यस्थिती पाहता जिल्‍हयात दिनांक 1 ऑक्टोंबर 2018 ते 30 जून 2019 या कालावधीमध्‍ये पाणी टंचा भासणारी गावे पुढील प्रमाणे आहेत. यात ऑक्‍टोबर 2018 ते डिसेंबर 2018 - (115 गावे), जानेवारी 2019 ते मार्च 2019- (110 गावे), एप्रिल 2019 ते जून 2019- (176 गावे ) असे एकूण 401 गावे सोबत दिलेल्या यादी नमुद करण्‍यात आली आहेत.
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...