डॉ.
कुलदीपक यांचा
तत्परतेमुळे
रुग्णाचे प्राण वाचले
नांदेड, दि. 19
:- अमोल देसाईराव देशमुख या व्यक्तीस झटके येत असल्यामुळे तो श्रीनगर येथे रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याक्षणी डॉ. कुलदीपक यांनी या रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे दाखल करुन
योग्य ते उपचार केले. डॉ. कुलदीपक यांनी तात्काळ केलेल्या
उपचारामुळे रुग्णाची सद्यस्थिती स्थिर असल्याचे दिसून आले.
येथील श्री गुरु
गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय
अधिकारी डॉ. कुलदीपक हे काही खासगी कामानिमित्त शनिवार 20 ऑक्टांबर रोजी सायं 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास बाहेर
गेले असता श्रीनगर येथील बेंगलोर बेकरीच्या बाजूस श्रीनगर येथील अमोल देसाईराव देशमुख या व्यक्तीस झटके येत असल्यामुळे
तो रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आले.
डॉ. कुलदीपक यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या सेवेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. एन आय भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर तसेच जिल्हा
रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही व्यक्तीने अपघात प्रसंगी बघ्याची
भूमिका न घेता अपघात ग्रस्त व्यक्तीचा प्राण कसा वाचू शकेल यासाठी योग्य ती मदत
करावी, जेणेकरून अशा अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचू शकेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment