Saturday, September 1, 2018


दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत
विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम
             
नांदेड दि. 1 :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या मतदारांची नावे या यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत ज्‍या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील.
            
  त्‍यासाठी दिनांक ०१ सप्‍टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी , सहायक मतदार नोंदणी अधिकारी व जिल्‍हा  निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर  करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट  करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.
             
सदर अर्ज मतदार नोदंणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा  तहसिलदार यांचे कार्यालयात त्‍याच प्रमाणे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी तथा बिएलओ यांचेकडे मतदान केंद्रावर सादर करता येतील. 
              मतदारांना त्‍यांचे अर्ज दि. 01 सप्‍टेबर 2018 ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधी मध्‍ये सादर करता येतील.
              दि.१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि.१ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे व जो त्‍या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.
               मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
              अधिक माहितीसाठी
 www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.  उपरोक्त सर्व माहिती दि. १ सप्टेंबर २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे विवरण
कालावधी
०१
प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी
शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८; 
०२
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
शनिवार, दि.१ सप्टेंबर ते बुधवार, दि.३१ ऑक्टोबर २०१८
०३
दावे व हरकती निकाली काढणे
शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी; 
०४
डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई
गुरुवार, दि.३ जानेवारी २०१९ पूर्वी;

०५
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी
शुक्रवार, दि. ४ जानेवारी २०१९
        
   दिनांक 01.01.2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीनुसार मतदारांची संख्‍या –
Ø  स्‍त्री मतदार-       1262175
Ø  पुरूष मतदार-    1160573
Ø  इतर मतदार –             58
एकूण मतदार -        2422806

v  मतदार यादीतील मतदारांची छायाचित्र टक्‍केवारी               99.69 %

v  मतदार यादीतील मतदारांची ओळखपत्र  टक्‍केवारी     99.74 %

दि.01.01.2018 च्‍या अर्हता दिनांकावर प्रसिध्‍द झालेल्‍या मतदार यादी नंतर झालेया विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम व निरंतर अद्ययावतीकरण कार्यक्रमानंतर,
Ø  समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या मतदारांची संख्‍या                    -       15205
Ø  वगळणी करण्‍यात आलेल्‍या मतदारांची संख्‍या                     -       31204
Ø  दि.०१ .०९.२०१८ रोजी प्रारुप मतदार यादीनुसार मतदारांची संख्‍या    -   2406807

मतदान केंद्र -
दिनांक 01.01.2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी प्रसिध्‍दीच्‍या वेळी मतदान केंद्राची संख्‍या – 
एकूण मतदान केंद्र                                               -2832
मतदान केंद्रात झालेली वाढ                                                          -  123
दिनांक – 01.09.2018  रोजी आता एकूण मतदान केंद्राची संख्‍या     --  2955
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...