जेष्ठ नागरिक दिनानिमित्त
आरोग्य तपासणी शिबिर
नांदेड, दि. 1 :- जेष्ठ
नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा लाभ जेष्ठ
नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर. गुंटूरकर यांनी केले
आहे.
जेष्ठ नागरिक
समन्वय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच
घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.
डोंगरे यांनी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील जिल्हा
रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात जेष्ठ
नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ
नागरिकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग, भौतिकोपचार सर्व
प्रकारचे रक्त तपासण्या, नेत्र तपासणी तसेच औषधोपचार व आरोग्यविषयक समुपदेशन
करण्यात यावे असे निर्देश दिले आहे.
त्याअनुषंगाने
1 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या
अध्यक्षतेखाली शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची
प्रमुख उपस्थिती राहील. इतर रुग्णालयात संबंधित अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हे
शिबीर होणार आहे.
आरोग्य शिबिरात
जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत सर्व प्रकारची आरोग्य तपासणी व
औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागातील
जेष्ठ नागरिक कक्षात दररोज जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. जेष्ठ नागरिकांनी
या दैनंदिन तपासणी व 1 ऑक्टोबर 2018 रोजीच्या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर. गुंटूरकर, अतिरिक्त जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ .एन आय. भोसीकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment