लोककला आणि पथनाट्य निवडसूची
अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत
मुदतवाढ
नांदेड, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला
व पथनाट्य यांची निवडसूचीसाठी अर्ज करण्यास मुदत
वाढविण्यात आली असून इच्छुक संस्था आता दिनांक १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज सादर
करू शकतात.
इच्छुक संस्थांनी
संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील इच्छुक
संस्थांनी उपसंचालक (माहिती), कोकणभवन,नवी मुंबई
यांच्याकडे अर्ज पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.
शासनाच्या
लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व
पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग,पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड
इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा
माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना निःशुल्क प्राप्त करून
घ्यावा.अर्जाचे नमुने व माहिती www.maharashtra.gov.in आणि
dgipr.maharashtra.gov.inया वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
००००
No comments:
Post a Comment