कर्ज वाटपासाठी धडक मोहिम राबविण्याचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आदेश
नांदेड, दि. 27 :- सद्यस्थितीत पीक कर्ज वाटपाच्या
एकूण उद्दिष्टापैकी केवळ 20 टक्के
कर्ज वाटप साध्य झाल्याने
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
चिंता व्यक्त केली आहे. कर्ज
वाटप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
सर्व यंत्रणांनी अभियान स्वरुपात
धडक मोहीम राबविण्यासाठी सर्व
तहसील कार्यालयाकडून नियुक्त
करण्यात आलेल्या पालक अधिकाऱ्यांना
30 जुलै ते 1 ऑगस्ट 2018 या तीन
दिवसात त्यांची नियुक्ती करण्यात
आलेल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत
आदेशीत करण्यात आले आहे.
पालक अधिकाऱ्यांनी
बँकेकडे जमा केलेल्या कर्ज
मागणी अर्जानुसार बँक शाखेकडून
कर्ज वाटप केले जात
आहे किंवा नाही याचा दैनंदिन आढावा घेण्याचे
व सर्व तहसीलदारांना दररोज
पालक अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा
आढावा घेण्याबाबत आदेशीत करुन
संबंधित तालुक्यातील कोणीही
मागणी करणारा पात्र शेतकरी
कर्जापासून वंचित राहणार नाही
याची दक्षता घेण्याचे आदेश
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी
दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व
पात्र शेतकरी लाभार्थ्याना व शासन
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2018 साठी बँकांनी
पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी
शासनस्तरावरुन सूचना आहेत व पीक
कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे
यांचे स्तरावर सर्व बँकांच्या
कर्ज वाटप प्रगतीचा वेळोवेळी
आढावा घेण्यात येत आहे.
पालक अधिकाऱ्यांनी
या तीन दिवसात आवश्यकतेनुसार
गावाशी संबंधित बँकेकडून कर्ज
मागणी अर्ज पुरेशा प्रमाणात
उपलब्ध करुन घेणे व शेतकऱ्यांशी
संपर्क साधून त्यांना कर्ज
मागणी अर्ज पुरवून कर्ज
मागणी अर्ज भरा करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे
तसेच शेतकऱ्यांचे कर्जमागणीचे
परिपूर्ण अर्ज भरुन घेऊन
संबंधित बँकेकडे जमा करुन
संबंधित बँक शाखा व्यवस्थापकाकडून दिलेल्या अर्जाची पोहोच प्राप्त
करुन घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे
यांनी आदेशीत केले आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment