Friday, July 27, 2018


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत
लाभ मिळण्याबाबत अडचणी असल्यास
तक्रार नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 27 :-  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत स्वस्त धान्य दुकान, शालेय पोषण आहार, महिला व बालविकास योजनेत लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रारी बाबत नागरिकांनी व लाभार्थ्यांनी नोंद करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांनी केले आहे.  
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्यादृष्टिने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय दि. 7 एप्रिल 2017 अन्वये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या अधिनियमांची अंमलबजावणी योग्यरित्या पार पाडण्याच्यादृष्टिने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या कलम 15 अन्वये अधिनियमातील प्रकरण दोन अन्वये हक्क असलेले अन्नधान्य किंवा आहार यांच्या वितरणासंबंधीच्या बाबीमध्ये व्यथित झालेल्या व्यक्तीची (लाभार्थांची) तक्रार शिघ्र व प्रभावीरितीने दूर करण्यासाठी आणि या अधिनियमानुसार हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याकरीता जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नांदेड हे जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त असतील. त्यांच्या अधिनस्त एक कक्ष / समिती निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी rajyaannaayog@gmail.com, dsonanded2@gmail.com दूरध्वनी क्रमांक (02462) 232521 यावर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...