Friday, July 27, 2018


वाहनधारकाचे अर्ज, वाहनाचा कर
1 ऑगस्ट पासून ऑनलाईन
नांदेड , दि. 27 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात येत्या 1 ऑगस्ट पासून वाहनधारकाचे सर्व अर्ज व परिवहन संवर्गातील वाहनांचा कर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. ज्या वाहनांची वाहन 4.0  प्रणालीवर नोंद घेण्यात आली आहे अशा वाहन धारकांना त्यांचा वाहनाचा कर भरणा तसेच इतर अर्ज parivahan.gov.in/vahanservice या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या नागरी सेवा केंद्र येथे करता येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
कुठल्याही स्वरुपाचे हस्तलिखीत अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ज्या वाहनांची अद्यापही वाहन 4.0 या ऑनलाईन प्रणालीवर बॅकलॉग नोंद घेण्यात आली नाही अशा  वाहनांचे सर्व वैध कागदपत्रे, वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात त्वरीत सादर करण्यात यावी. वाहनधारकांने कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर सात दिवसात वाहनांची बॅकलॉग नोंद वाहन 4.0 प्रणालीवर घेण्यात येऊन अशी प्रकरणे निकाली काढण्यात येतील. याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिहवन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1243 देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ नांदेड दि. 30 डिसेंबर :    राज्यातील गोसेवा आ...