Thursday, April 19, 2018

परभणी आकाशवाणीवर शनिवारी फुलारी, मोरे, चुकेवाड आणि अनमुलवाड यांचे काव्यवाचन
 
नांदेड दि.20: आकाशवाणी परभणी केंद्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.या केंद्राची मागील पन्नास वर्षांपासूनची वाटचाल यशस्वी राहिली आहे. परिसरातील समाज, संस्कृती, भाषा,शिक्षण, साहित्य, कला, कृषी इत्यादींविषयी ज्ञानपूर्ण आणि वैविध्यपूर्ण माहिती प्रसारित करून ती जनमाणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. आकाशवाणीचं हे औरंगाबाद-परभणी केंद्र आहे हा ध्वनी एकेकाळी संपूर्ण मराठवाड्याला मोहित केला होता. ज्ञानापासून मनोरंजनापर्यंतची विविधता जपणारं हे केंद्र आता सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. 
या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त काव्यसंध्या या लोकप्रिय कार्यक्रमासाठी नांदेडचे कवी देविदास फुलारी, महेश मोरे, माधव चुकेवाड आणि वैजनाथ अनमुलवाड यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांनी भावकविता, ग्रामीण कविता, बालकविता आणि आदिवासी कविता अशा भिन्न आशय आणि विविध जाणीवेच्या एकापेक्षा एक सुंदर कविता या कवींनी सादर केल्या आहेत. 
 काव्यविविधा असे संबोधण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन देविदास फुलारी आणि वैजनाथ अनमुलवाड यांनी केले आहे.हा कार्यक्रम शनिवारी दि.२१ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ६:३० वा. प्रसारित होत असल्याची माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश जोशी यांनी दिली आहे. रसिक-श्रोत्यांनी या तर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेही आकाशवाणी परभणी केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
****

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...