Thursday, April 19, 2018


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे

नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 19 :- केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक, महामार्ग , जहाज बांधणी, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान नितीन गडकरी यांचे नागपूर येथून नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने औरंगाबादचे उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज बांधणी, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान नितीन गडकरी महोदयांचे स्वागत केले. तसेच आ. डि. पी. सावंत, आमदार अमिताताई चव्हाण, गणपतराव तिडके, माजी आमदार राहिदास चव्हाण, नगरसेवक किशोर स्वामी यांनी करुन विविध मागण्यांचे निवेदन दिले . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत खा. रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती.

यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती.  

****   

 


 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...