Thursday, April 19, 2018





मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 19 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई येथून नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने औरंगाबादचे उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांचे स्वागत केले.  तसेच आ. डि. पी. सावंत, आमदार अमिताताई चव्हाण, गणपतराव तिडके, माजी आमदार राहिदास चव्हाण, नगरसेवक किशोर स्वामी यांनी करुन विविध मागण्यांचे निवेदन दिले . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत खा. रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती.
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती.
****   
 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...