Wednesday, February 14, 2018


अल्पसंख्यांक योजनांची
माहिती देण्यासाठी कार्यशाळा  
नांदेड, दि. 14 :- अल्‍पसंख्‍यांक समाजासाठी राबवयेत असलेल्‍या शासनाच्या योजनांची माहिती व्‍हावी व त्‍यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 24 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली आहे.
अल्‍पसंख्‍यांकांच्या सर्वंकष विकासासाठी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या योजनांचा प्रसार करण्‍याचे शासनाचे धोरण आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्‍यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्‍तीतजास्‍त जनतेपर्यंत पोहचविण्‍याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, संबंधितांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...