Monday, August 7, 2017

दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या
 नाव नोंदणीसाठी शाळांना आवाहन
           नांदेड, दि. 7 :- इयत्ता दहावीच्या मार्च 2018 मधील परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.    
            मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण मंडळाने पुढील प्रमाणे सुचना दिल्या आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज क्र. 17 ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत सुचना काढून आपल्या माध्यमिक शाळेमार्फत याबाबतची माहिती दयावी. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणताही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज 21 ऑगस्ट 2017 पर्यंत ऑनलाईन भरावयाची आहेत. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून 23 ऑगस्ट 2017 पर्यंत विहित शुल्क व कागदपत्रांसह अर्जांवर नमुद केलेल्या शाळेमध्ये जमा करावी. संबंधीत संपर्क केंद्रांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह 28 ऑगस्ट 2017 पर्यंत मंडळाकडे जमा करावीत. प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठी सुचना संकेतस्थळावर मराठी, इंग्रजीत उपलब्ध आहे. त्या वाचून अर्ज करण्यास सुरवात करावी.
            विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला मुळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील छायाचित्रे स्वत: जवळ ठेवावी. ऑनलाईन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर मोबाईलद्वारे फोटो काढून ते अपलोड करावीत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपुर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने नमुद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहेत. तसेच या संपुर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे, अर्जावर नमुद केलेल्या शाळेमध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशील पुढील प्रमाणे आहे. इयत्ता दहावी- 1 हजार रुपये नाव नोंदणी शुल्क व 100 रु. प्रक्रिया शुल्क. कोणताही विद्यार्थी या सुविधेपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता शाळांनी कटाक्षाने घ्यावी, असेही आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे.  

0000000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...