Monday, August 7, 2017

सोयाबीन, कपाशीवरील
किड संरक्षणासाठी कृषि संदेश
 नांदेड, दि. 7 :-  जिल्ह्यात सोयाबीन, कापुस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. पिकावरील किड संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी पुढील प्रमाणे कृषी संदेश दिला आहे.
सोयाबीनवरील उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी निबोंळी अर्क 5 टक्के किंवा 75 टक्के पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास बॅसिलस थुरीनजेनसिंस या जैविक किटकनाशकाची 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. चक्री भुंगा या सोयाबीनवरील किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथोन्झॉम 12.6 टक्के अधिक लॅमडा साहिलोथ्रीन 9.5 टक्के 2.50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलियम लेकॅनी 50 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. तसेच ॲसिफेट 50 टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड 1.8 एस पी 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. गुलाबी बोंडअळीसाठी 20 टक्के देशी कापुस पारंपारीक बिगर बीटी कापुस किंवा उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पिक म्हणुन लावावे. तसेच कापुस पिकात कामगंध सापळे एकरी पाच या प्रमाणात लावून पतंगाची संख्या नोंद यावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...