महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे
प्रवेश, परीक्षेपासून वंचित ठेवू नये
नांदेड,
दि. 26 :- भारत
सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा
शुल्क योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील शिक्षण व इतर शुल्काची रक्कम महाविद्यालयास मिळाली
नाही त्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाची शुल्क संगणक प्रणाली सुरु झाल्यावर बँक खात्यावर
जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशापासून वंचित ठेवू नाही. जे विद्यार्थी परीक्षा पात्र झाले
आहेत त्यांचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा
दाखला, तत्सम दस्तऐवज
अडवू नाही. विद्यार्थ्यांना
तत्सम दस्तऐवज देण्यास नकार दिल्यास संबंधित महाविद्यालयांविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील नांदेड जिल्हयातील 45 हजार 720
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती, फ्रिशीप अर्ज भरले होते. त्यापैकी 38 हजार 133
विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील 7 हजार 410
विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत संगणक प्रणाली मास्टेक या कंपनीचा करार संपल्यामुळे
भारत सरकार शिष्यवृत्तीचे संकेतस्थळ बंद आहे. शासनाकडून आय.टी.(I.T.)
विभागामार्फत Unitied portal विकसित होत आहे. या DBT
Portal ( Direct benefiet Transfer) द्वारेच ई-स्कॉलरशिप योजना राबविण्यात
येणार आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा
फी योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2011-12 पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ई-स्कॉलरशीप प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शालांत
परीक्षा उत्तीर्ण होऊन कनिष्ठ, वरिष्ठ, पदवी, पदव्युत्तर इत्यादी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित,व्यावसायिक, बिगरव्यावसायिक महाविद्यालयातील अनु.जाती, विमुक्त जाती भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग व विशेष
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना निर्वाह भत्ताची रक्कम थेट बँक खात्यावर
जमा करण्यात येते. तसेच संबंधित महाविद्यालयाची शिक्षण फी व इतर
फीची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात
येते.
000000
No comments:
Post a Comment