Wednesday, July 26, 2017

एसटीच्या सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी
30 जुलैला फेर लेखी परीक्षा 
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागातर्फे सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत पदे भरण्याबाबत जानेवारी 2017 मध्ये वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. यापैकी सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी फेर लेखी परीक्षा रविवार 30 जुलै 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
संबंधीत उमेदवारांना एसएमएसद्वारे फेर लेखी परीक्षचे प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. याबाबत संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  विभाग नियंत्रक, राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...