शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ;
अर्ज करण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदत
नांदेड दि. 26 :- शेतकऱ्यांना विविध देशातील तंत्रज्ञान कळावे या
उद्देशाने देशाबाहेरील अभ्यास दौरा होणार असून यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी गुरुवार
31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
कृषि विभागाच्यावतीने सन
2017-18 या वर्षासाठी इस्त्राईल, जर्मनी / नेदरलँड आणि ऑस्ट्रोलिया या प्रमाणे
अभ्यास दौऱ्यांचे नियोजन आहे. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खर्चाच्या
50 टक्के किंवा जास्तीतजास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनाकडून
दिले जाणार आहे. या दौऱ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे पासपोर्ट, विमा पॉलिसी,
स्वत:चे नाव असलेला सात-बारा व नमुना आठ अ असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादरकर्ता
अर्जदार 25 ते 60 वर्षे वयोगटातील शेतकरी असावा. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन हे
शेती असावे. तसेच शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थेत नोकरीस, वैद्यकीय क्षेत्रातील
डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यवसायीक नसावा.
शेतकऱ्यांनी विहित
प्रपत्रातील परिपुर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक
माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment