Saturday, May 6, 2017

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु
नांदेड दि. 6 :-  हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. सोलापूर क्षेत्रीय कार्यालय व सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पेट्रोल पंपाची तपासणी मोहीम शुक्रवार 5 मे रोजी पासून राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने शुक्रवार 5 मे रोजी मे. वैशालीताई पावडे पेट्रोलियम निला येथे पेट्रोलियम पदार्थाचे माप व गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. यावेळी कंपनीचे वरीष्ठ मोबाईल अधिकारी शांताराम पाटील, वरिष्ठ परिचालन अधिकारी राकेश रेड्डी, सहायक नियंत्रक संजीव कवरे, वैधमापन शास्त्र निरीक्षक के. एन. रिठे व ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते.  पुढील येणाऱ्या दिवसात जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...