Saturday, May 6, 2017

वाहनांवरील दिवे काढण्याबाबत
आरटीओचे आवाहन
            नांदेड दि. 6 :-  जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी केंद्र शासनाच्या सुधारणेनुसार ज्या वाहनांवर दिवा लावण्यास अनुज्ञेय नाही त्या वाहनांवरील लाल, अंबर दिवे व ॲम्ब्युलन्सवरील दिवे काढून टाकावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

            केंद्र सरकारने 1 मे 2017 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 108 मध्ये सुधारणा केली आहे. या तरतुदीनुसार वाहनांवरील लाल / अंबर दिवा तसेच ॲम्ब्युलन्सवरील दिवा अनुज्ञेय नाही. त्याच बरोबर उच्च पदस्थांच्या एस्कॉर्टींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत. आपत्कालीन किंवा आणिबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनांवर केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल त्यानुसार बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. त्याशिवाय एअरपोर्ट, बंदरक्षेत्र, खनिक्षेत्र आणि प्रकल्पांच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनांवर त्यांच्या कार्यक्षेत्रात अंबर दिवा लावता येईल. 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...