Saturday, May 6, 2017

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे राज्याचे स्वच्छतादूत- प्रधान सचिव राजेश कुमार

नांदेड दि. 6 :-  सोलापूर जिल्हा परिषदेत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी स्वच्छता अभियानात राबविलेले उपक्रम राज्याला प्रेरणादायी आहेत. श्री. डोंगरे राज्याचे स्वच्छतादूत म्हणून मार्गदर्शन करतील असे मत राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी आज पुणे येथे व्यक्त केले. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत मार्च 2018 अखेर संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी हॉटेल ऑरचिड पुणे येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय आत्मसन्मान 4 कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. राजेशकुमार बोलत होते. 
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी  व सोलापुरचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या स्वच्छ भारत मिशनच्या विविध उपक्रमाचे प्रभावाशील सादरीकरण केले.
या कार्यशाळेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर १० प्रदर्शनी फलकांपैकी पाच फलकांवर सोलापूर जिल्ह्यातील विविध उपक्रमांची दखल घेण्यात आली आहे. या प्रसंगी जलस्वराज्य प्रकल्प व्यवस्थापक  डॉ. दिलीप देशमुख,   नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थाचे संचालक डॉ. सतीश उमरीकर,  युनिसेफ मुंबई चे कार्यक्रम अधिकारी आनंद घोडके यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत या पुढील संपूर्ण वर्षांची रणनीती ठरविणे, स्थिती समजून घेणे, कृती कार्यक्रम ठरविणे या सर्व बाबींवर चिंतन या कार्यशाळेत करणेत आले. 
या कार्यशाळेस राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपयुक्त विकास,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, युनिसेफ, मुंबई चे प्रतिनिधी , वासो चे सर्व अधिकारी/सल्लागार या कार्यशाळेत सहभागी झाले होते. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत पाणी, स्वच्छता या विषयावर मंथन  झाले.
 तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने घेतली. नादेंडचे जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतरही त्यांना खास निमंत्रण देऊन बोलाविण्यात आले होते. या कार्यशाळेत शालेय स्वच्छतादूत उपक्रम, एक लक्ष शौचालय बांधकाम नियोजन, स्वच्छता गुढी उपक्रम, कुटूंब स्तर संवाद अभियान, आदी बाबींवर प्रेझेंटेशन केले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, उप मुख्य राजेंद्र अहिरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या उपक्रमाची माहिती दिली.
आत्मसन्मान कार्यशाळेसाठी जिल्हाधिकारी डोंगरे खास निमंत्रित !
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने घेतली. नादेंडचे जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना खास निमंत्रण देऊन कार्यशाळेस बोलाविण्यात आले होते. या कार्यशाळेत शालेय स्वच्छतादूत उपक्रम, एक लक्ष शौचालय बांधकाम नियोजन, स्वच्छता गुढी उपक्रम, कुटूंब स्तर संवाद अभियान, आदी बाबींवर सादरीकरण करण्यात आले. कार्यशाळेत पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या उपक्रमाची माहिती देण्यात आली, तसेच शौचालय तांत्रिक बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...