Saturday, May 6, 2017

"नीट" साठी उद्या 35 केंद्रावर
13 हजार 713 विद्यार्थ्यांची परीक्षा  

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 6 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2017 रविवार 7 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे. नांदेड केंद्रातर्गत या वर्षी पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. नांदेड शहरात 34 आणि मुदखेड येथील एक अशी एकूण 35 परीक्षा उपकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी सुमारे तेरा हजारांवर विद्यार्थ्यांनी नांदेड केंद्राची निवड केली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
परीक्षा संयोजनाची जबाबदारी होरायझन डिस्कव्हरी ॲकडमीकडे आहे. त्यासाठी समन्वयक म्हणून ॲकडमीचे प्राचार्य फनींद्र बोरा तसेच नीटचे अधिकारी एस.आय. उस्ताद, होरायजन ॲकडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. सिरसाट परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
नांदेड केंद्रांतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 13 हजार 713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी नीटकडून मुदखेडसह शहरात 35 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांची नावे पुढील प्रमाणे (कंसात विद्यार्थी संख्या )-  आंध्र समिती तेलगू हायस्कूल नांदेड (240), केंब्रीज विद्यालय (360), शासकीय तंत्रनिकेतन (240), ग्रामीण कॉलेज ॲड इंजिनिअरिंग (240), ग्रामीण तंत्रनिकेतन (480), गुजरार्थी हायस्कुल (420), ग्यान माता विद्या विहार (300), होरायजन डिस्कव्हरी ॲकडमी (393), इंदिरा गांधी महाविद्यालय (420), इंदिरा गांधी हायस्कुल (300), किड्स किंगडम् पब्लिक स्कूल (420), कुसूमताई हायस्कूल (240), महात्मा फुले हायस्कूल (540), मातोश्री प्रतिष्ठान स्कूल ऑफ इंजिनीअरींग (360), एमजीएम कॉलेज (480), नागार्जूना पब्लिक स्कूल (420), नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज (600), एनएसबी कॉलेज (360), ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल (840), ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल (420), पिपल्स हायस्कूल (240), प्रतिभा निकेतन हायस्कूल (360), प्रतिभा निकेतन कॉलेज (360), राजर्षी शाहू विद्यालय आणि कॉलेज (360), एसएसएस कॉलेज ऑफ एज्युकेशन सहयोग कॅम्पस (240), सावित्रीबाई फुले हायस्कूल (240), सायन्स कॉलेज (360), शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (240), श्री शारदा भवन स्कूल (300), श्री शिवाजी माध्यमीक आणि उच्च माध्यमिक विद्यालय (240), एसएसएस इंदिरा इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी-पॉलीटेक्नीक (420), विश्वभारती पॉलीटेक्नीक इन्स्टीट्युट (480), यशवंत महाविद्यालय-लातूर बोर्ड (780), यशवंत महाविद्यालय-एसआरटीएम (780) आणि मुदखेड केंद्रीय विद्यालय (240).
परीक्षेसाठी आवश्यक आरोग्य पथके, परीक्षा केंद्रांवरील सोई-सुविधा, पिण्याचे पाणी,  तसेच या दिवशी परीक्षा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा राहील यासाठीचे नियोजन, वाहतुकीसाठी पुरेशा शहर वाहतूक बस, याशिवाय परीक्षा साहित्यासाठीची अनुषंगीक वाहतूक व्यवस्था, परीक्षा केंद्रांवरील पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबत यापुर्वीच नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी, संबंधीत पर्यवेक्षक आदींची प्रशिक्षणही वेळेत पुर्ण करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष नीट परीक्षेचे रविवार 7 मे रोजीचे वेळापत्रक
विद्यार्थ्यांना परीक्षाहॅाल मध्ये प्रवेश
सकाळी 7.30 वा.पासून
परीक्षा प्रवेशपत्रांची पडताळणी
सकाळी 7.30 ते 9.45. वाजेपर्यंत
प्रश्नपत्रिकांची वाटप
सकाळी 9.45 वाजता
प्रश्नपत्रिका उघडणे,
त्यातून उत्तरपत्रिका बाहेर काढणे
स. 9.55 वा.
परीक्षा हॅालमध्ये उशिरात उशिरा प्रवेश देणे
सकाळी 9.30 वा.
परीक्षा सुरु
सकाळी 10.00 वा.
परीक्षा कालावधी समाप्त
दुपारी 1.00 वा.
परीक्षेचे निकाल
गुरूवार 8 जून 2017.

परीक्षासाहित्याविषयी विद्यार्थ्यांना सूचना
परीक्षा हॅालमध्ये विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा प्रवेशपत्र (ॲडमीट कार्ड), विहीत नमुन्यावर लावलेले पासपोर्ट आकाराचे तसेच पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र, इतकेच साहित्य नेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना कच्चे लेखन (रफ वर्क) हे प्रश्नपत्रिकेत विहीत केलेल्या रिकाम्या जागेतच करता येईल. मशिन्सव्दारे तपासण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिकेवर कोणत्याही स्वरुपात खुणा किंवा कच्चे लेखन करता येणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी निळे किंवा काळ्या शाईचे बॅाल प्वाईंट पेनच वापरता येणार आहे. असे पेन परीक्षा केंद्रावरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पेनद्वारेच प्रश्नपत्रिका संचावरील माहिती तसेच तसेच उत्तरपत्रिकेतील उत्तर नोंदविता येणार आहेत.

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...