Monday, January 9, 2017

पिपल्स, यशवंत महाविद्यालयात
आज स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर  

नांदेड, दि. 9 :-  उज्ज्वल नांदेड  मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवार 10 जानेवारी 2017 रोजी दुपारी 2.30 वा. पिपल्स महाविद्यालयात ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांचे स्पर्धा परिक्षा विषयक व्याख्यान तसेच दुपारी 4.30 वा. यशवंत महाविद्यालयात सहायक विक्रीकर आयुक्त  रविंद्र जोगदंड यांचे एसटीआय परीक्षा तयारी याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

महत्वाचे वृत्त  क्रमांक   216 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत  नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वित...