विधानपरिषद
निवडणूक मतदान केंद्र
परिसरात
प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड
दि. 17 :- महाराष्ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतदानाची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून
तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहवी यादृष्टीने शनिवार 19
नोव्हेंबर 2016 रोजी मतदान केंद्र
परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम
144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी
नांदेड कार्यालयानी कळविले आहे.
नांदेड जिल्हयातील तहसिल
कार्यालय नांदेड, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या मतदान
केद्र परिसरात शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान
केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस
फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स
उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व
निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता प्रतिबंधीत करण्यात
आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment