माजी राष्ट्रपती
कलाम यांचा जन्मदिवस
"वाचन
प्रेरणा दिन" म्हणून साजरा करावा
नांदेड, दि. 29
:- माजी राष्ट्रपती स्व.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन
प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार हा
दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
शासन निर्णयानुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये
वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने
यापुर्वी शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाचन
प्रेरणा दिन साजरा करण्याच्यादृष्टिने सर्व विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व
शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळ, सार्वजनिक उपक्रम इत्यादी
कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करावे.
शनिवार
15 ऑक्टोंबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात
यावा. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी
सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट दयावे.
व्हॉटशॉप, इंटरनेट, फेसबुक, टिवटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन
संस्कृती वृद्धींगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत. व्याख्यान,
भाषण, चर्चासत्र, सामुहिक वाचन, अभिवाचन, वाचन अनुभव कथन, ग्रंथप्रदर्शन, विविध
स्पर्धा इत्यादी पैकी सुयोग्य उपक्रम राबवावेत. विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध
व्यक्ती ज्यांचा वाचक म्हणूनही लौकिक आहे. त्याचे सहकार्य घेऊन आयोजित कार्यक्रम
यशस्वी करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी
कार्यालय नांदेड कार्यालयास सादर करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड
यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन शाखा यांनी दिले आहे.
00000
No comments:
Post a Comment