ज्येष्ठ
नागरिक दिनानिमित्त
स्त्री
रुग्णालय शामनगर येथे आरोग्य तपासणी
नांदेड दि. 29 :- “जागतिक
ह्रदय दिन 2016 व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह ” निमित्त स्त्री रुग्णालय श्यामनगर
नांदेड येथे 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर 2016 या कालावधी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत
ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब,
मौखीक आरोग्य, ह्दयविकार, मोतीबिंदू इत्यादी आरोग्य विषयक तपासणी व पुढील उपचार
करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत “जागतिक
ह्रदय दिन, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह ” दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय नांदेड येथे
कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी, एनसीडी,
एनएचएम, ज्येष्ठ नागरिक व जिल्हा रुग्णालयातील
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य
चिकित्सक तथा कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी सर्वाना ह्दयविकार
आजारापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान अर्धा तास पायी चालावे. तसेच ज्येष्ठ
नागरिकांनी आरोग्यदायी जीवन शैलीचा अवलंब करावा याविषयी माहिती दिली.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नागापूरकर म्हणाले की , मानवाची भौतिक
सुविधांमुळे शरीराची हालचाल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे ह्दयविकारासारखे
आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सर्वांनी शरिराची हालचाल होईल अशी कामे करावी.
सर्व अवयवांची योग्य हालचाल झाल्यामुळे हृदयविकारापासून दूर राहता येते. डॉ.
भोसीकर यांनी लहान मुलांना होणा-या ह्दयविकार बद्दल माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम
अधिकारी डॉ दिपक हजारी यांनी ह्दयविकाराबद्दल माहिती दिली व ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी व्यायाम
करावे असे सांगितले.
000000
No comments:
Post a Comment