Monday, August 15, 2016

“आपलं नांदेड” या मोबाईल ॲपचे
राज्यमंत्री खोतकर यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 15 :- जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलीक माहितीसह 28 प्रकारच्या विविध विषयांची उपयुक्त माहिती असलेले “आपलं नांदेड” या मोबाईल अँड्राईड-ॲपचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात संपन्न झाले. जनतेला या मोबाईल ॲपमुळे सहज माहिती उपलब्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम निश्चित चांगला आहे, असे गौरवोद्गार श्री. खोतकर यांनी काढले.
यावेळी आमदार सर्वश्री. डी. पी. सावंत, अमर राजूरकर, हेमंत पाटील तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर आदी अधिकारी , मान्यवर व्यक्ती, कर्मचारी उपस्थित होते.
“आपलं नांदेड” या मोबाईल ॲपच्या प्रथम आवृत्तीत नांदेड जिल्ह्याचा ऐतिहासिक मागोवा आणि भौगोलीक माहितीसह सर्वसामान्य नागरिकांना नेहमी लागणाऱ्या आवश्यक 28 प्रकारच्या विविध विषयांच्या माहितीचा अंतर्भाव केलेला आहे. भविष्यात यात आणखी उपयुक्त माहितीचाही समावेश केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिली.
जिल्ह्याचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (एनआयसी) श्री. पोटेकर यांच्या संघाने निर्मिती केल्याबद्दल श्री. पोटेकर  व विठ्ठल लादे यांना राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी या ॲप मागील भुमिका विषद केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधुनिकीकरण झालेल्या सामान्य शाखा व महसूल शाखा यांच्या कक्षाचे उद्घाटनही श्री. खोतकर यांच्या हस्ते  करण्यात आले.
000000



No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...