Tuesday, August 16, 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे
गुरुवारी पुणे येथे वितरण सोहळा
नांदेड, दि. 16 :- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण  पुरस्कार सन 2015-16 चा वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे गुरुवार 18 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वा संपन्न होणार आहे.           
या कार्यक्रमास  सामाजिक न्याय   विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री मंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.
सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठया प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.  
000000

  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...