व्यसनमुक्ती
सेवा पुरस्कारासाठी
22
ऑगस्ट अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 18 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी
विहीत अर्ज नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथे उपलब्ध असून
संबंधित व्यक्ती, संस्थांनी त्यांचे परीपूर्ण अर्ज प्रस्ताव सोमवार 22 ऑगस्ट 2016
पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी
केले आहे.
सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलीक कार्य करणाऱ्या
राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती
क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद दयावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणे करुन व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते
सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढविताना सर्व समावेशकता
निर्माण करणे , त्या योग्य पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेवून
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देवून
गौरविण्यात येते.
पुरस्काराचे
स्वरुप पुढील प्रमाणे राहील. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला 15 हजार रुपये तर
संस्थेला 30 हजार रुपये तसेच सन्मानपत्र,
स्मृतिचिन्ह, शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ देण्यात येते. तर या पुरस्काराची
संख्या पुढीलप्रमाणे आहे. व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी- लेखक, कवि, पत्रकार / संपादक
व साहित्यीक (प्रत्येकी एक) 5 पुरस्कार. सामाजिक कार्यकर्ते 10 पुरस्कार. किर्तनकार,
प्रवचनकार 4 पुरस्कार. पारंपारिक लोक कलावंत उदा. शाहीर, गोंधळी, भारुडकार,
पोतराज, वासूदेव, लोकनाट्यकार (प्रत्येकी एक)
सहा पुरस्कार. शासकीय अधिकारी / कर्मचारी, निमशासकीय अधिकारी / कर्मचारी तीन पुरस्कार.
सामाजिक
सेवाभावी संस्थांसाठी तीन पुरस्कार, युवक मंडळे, महिला
मंडळे, भजनी मंडळे, बचत गट व क्रिडा मंडळे तीन पुरस्कार. शाळा व महाविद्यालयांसाठी
(प्रत्येकी एक) तीन पुरस्कार. मिडीयासाठी वृत्तपत्रे
(हिंदी, इंग्रजी व मराठी ) प्रत्येकी एक तीन पुरस्कार. इलेक्ट्रॉनिक मिडीया दोन
पुरस्कार. उद्योग- कारखाने- तीन पुरस्कार, उद्योग व्यवस्थापन-तीन पुरस्कार, मजूर
संघटना-तीन पुरस्कार असे एकुण 51 पुरस्कार देण्यात येतात.
वरील
विविध गटातून देण्यात येणाऱ्या 51 पुरस्कारांसाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व
मौलीक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाकडून शिफारशी व कागदपत्रांसह अर्ज / प्रस्ताव
मागविण्यात येत आहेत.
यासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे आहेत. व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलीक / भरीव कार्य करणारी व्यक्ती /
संस्था असावी. या पुरस्कारासाठी वयाची अट बंधनकारक नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात
कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावी. पुरस्कारासाठी व्यक्ती
राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर किमान 15
वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केलेले असावे, पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र
समजण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा
परिषद सभासद व इतर कोणतेही लोकप्रतिनिधी पुरस्कारासाठी
पात्र राहतील. संस्था नोंदणी अधिनियम 1860 व 1950 प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
संस्था किमान 15 वर्षे जुनी असणे गरजेचे आहे व संस्थेने किमान 10 वर्षे
व्यसनमुक्ती क्षेत्रात अधिक कार्य केलेले असावे व मागील 5 वर्षाचे लेखा अहवाल,
वार्षिक अहवाल जोडणे आवश्यक आहे.
0000000
No comments:
Post a Comment