वृत्त क्रमांक 1100
मोटार सायकल वाहनासाठी नवीन मालिका
नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- परिवहनेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26-CX ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज गुरूवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. या अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी) सुध्दा सादर करावा. मुदतीनंतर व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त
झाल्यास 16 ऑक्टोबर रोजी
दुपारी 4 वा. दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment