वृत्त क्रमांक 1098
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 93 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड
दि. 15 ऑक्टोबर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली.
या घटनेला 15 ऑक्टोंबर 2025 रोजी 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण नांदेड व जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी व जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय
विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज संपन्न झाला.
याप्रसंगी
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त
तथा सदस्य श्रीमती डॉ. छाया कुलाल या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी रामचंद्र वंगाटे , जिल्हा समाज कल्याण
अधिकारी सतेंद्र आऊलवार, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, वरिष्ठ समाज कल्याण
निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, समाज कल्याण निरिक्षक संजय कदम, इतर मागास बहुजन
कल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी राहूल शेजुल हे होते.
याप्रसंगी
महामानवाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलीत करण्यात आले तसेच याप्रसंगी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तद्नंतर
संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामुहीक वाचन करण्यात आले.
जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्रीमती डॉ. छाया कुलाल यांनी
आपल्या अध्यक्षीय भाषणात
सामाजिक न्याय विभागाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व अधिकारी
कर्मचारी यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या
स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी
सामाजिक न्याय विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे ऋण व्यक्त करून
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थींनी यांना शुभेच्छा
दिल्या.
कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी रामचंद्र
वंगाटे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त
केले. तसेच तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी सामाजिक न्याय विभागाची स्थापना
कशी झाली याची संपूर्ण क्रमबध्द माहिती देवून मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड
कार्यालयातील जिल्हा जात पडताळणी, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग नांदेड, विविध
महामंडळाचे अधिकारी-कर्मचाचारी उपस्थित होते. सुत्रसचंलन गजानन पंपटवार यांनी केले
तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात
आली.
0000
No comments:
Post a Comment