Friday, September 19, 2025

वृत्त क्रमांक 985   

किनवट उपविभागीय कार्यालयात दाखल

अपील प्रकरणे तडजोडीने निकाली काढता येणार 

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025  रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांना अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणुन किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत दाखल झालेली अपील प्रकरणे लोकअदालत मोहिमेच्या धर्तीवर तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. याद्वारे प्रस्तुत कार्यालयात दाखल अपील प्रकरणातील सर्व पक्षकार व विधिज्ञ यांना नोंद घ्यावी असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.   

यासंदर्भात प्रस्तुत कार्यालयात दाखल अपील प्रकरणातील सर्व पक्षकार व विधिज्ञ यांनी आपसातील तडजोडनुसार किंवा स्वसंमतीने प्रकरणे निकाली काढावयाची असल्यास पक्षकार स्वतः किंवा आपल्या विधिज्ञामार्फत मंगळवार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे लिखीत स्वरुपात निवेदन सादर करावे. अशा प्रकार प्राप्त झालेली निवेदने सेवा पंधरवडा या कालावधीत निकाली काढण्याच्या कार्यवाहीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या अपील प्रकरणांच्या आपसातील तडजोडीबाबत तपशीलवार निवेदने सादर करुन सहकार्य करावे, असेही आवाहन सहायक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...