वृत्त क्रमांक 984
येसगीच्या जुन्या नवीन पुलावरील वाहतुकीची
16 नोव्हेंबर 2021 रोजीची अधिसूचना रद्द
नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील येसगी जुन्या पुलावरुन 20 टन वाहन भार क्षमतेपेक्षा कमी भार असलेली वाहतुक सुरू करण्याबाबत व येसगी मांजरा नदीवरील येसगी नवीन पुलावरुन कसल्याही प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्याबाबतची 16 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसुचना रद्द करण्यात आली आहे. याबाबत अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड
यांनी कायदा व सुव्यवस्थेच्याा अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. अधिक्षक अभियंता
सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी वाहतुक संबंधाने आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे
इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. या अधिसुचनेबाबतची माहिती लगतच्या सर्व जिल्हा प्रशासन,
पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग व इतर आवश्यक सर्व संबंधित विभागास अधिक्षक
अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी द्यावी, असेही अधिसुचनेत स्पष्ट केले
आहे.
00000
No comments:
Post a Comment