वृत्त क्रमांक 982
संपर्क तुटलेल्या
राहेगावात वैद्यकीय पथक दाखल
एसडीआरएफची मदत, महसूलची कौतुकास्पद कामगिरी
नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर पाणी आल्यामुळे सतत 5 दिवस गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे गावातील आजारी नागरिकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याची सूचना प्राप्त होताच महसूल विभागाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने वैद्यकीय पथक 18 सप्टेंबर रोजी राहेगावात पोहचवून गावातील 105 रूग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले, यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी राहेगाव-किकी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी येवून राहेगावचा संपर्क तुटलेला होता.गावातील नागरिकांनी गावातील आजारी लोकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत नांदेडचे तहसिलदार संजय वारकड यांना कळविले. त्यानुसार त्यांनी सदर बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना अवगत केली. त्यानुसार जिल्हाधिकारी व नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार संजय वारकड यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, (धुळे) चे पोलीस निरिक्षक प्रशांत राठोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार एसडीआरएफ पथकाच्या सहाय्याने बोटीने वैद्यकीय पथक राहेगाव येथे पोहोचले. पथकाने गावातील 105 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले.
या कार्यवाहीत एसडीआरएफचे पथक,स्टाफ
नर्स रियाज शेख, श्रीमती एस.जी.करंकाळ, वैद्यकीय
पथकाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शेख हसन, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, शेख
मुमताज, तसेच वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम
महसूल अधिकारी गौतम पांढरे,
पोलीस पाटील प्रतिनिधी संजय इंगळे, किकीचे
पोलीस पाटील गोविंद तेलंगे,
आशाताई श्रीमती सुमित्रा इंगळे यांनी योगदान दिले. सदर मदत
कार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशी माहिती मंडळ अधिकारी वाजेगाव
यांनी केली.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment