Monday, June 16, 2025

वृत्त क्रमांक 624

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना 

लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

 नांदेड, दि. 16 जून :- येत्या शैक्षणिक वर्षात 2025-26 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. 

प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, अशी माहिती वैद्य बिडी वर्कर वेलफेअर फंड डिस्पेंसरी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...