वृत्त क्रमांक 623
शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प
स्वागताचा उपक्रम
लोकप्रतिनिधी, अधिकारी
आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला स्नेहबंध
नांदेड, 16 जून :- जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेट उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी, शिक्षक व पालक यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तर नवागत पहिलीतील विद्यार्थ्यांना फुले, पुस्तके, पेन्सिल तसेच स्मरणघडी पत्रिका देऊन स्वागत करण्यात आले.
खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर येथील नूतन कन्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी माहूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेस भेट देवून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. आमदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद-हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नांदेड तालुक्यातील पासदगाव शाळेला भेट दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील सोनखेड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार राजेश पवार यांनी घुगराळा येथील जिल्हा परिषद शाळेत, तर आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुगट येथील शाळेत चिमुकल्यांशी हितगुज केले. आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनी जवाहरनगर तुप्पा येथील शाळेला भेट दिली. आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी हदगाव तालुक्यातील कोहळी व निवघा येथील शाळांना भेटी दिल्या. खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे बंधु बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांत गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील शाळेस तर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई कल्याणकर यांनी निळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वाजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हदगाव तालुक्यातील तामसा येथील शाळेत, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार वाघी प, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वसरणी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन नवागतांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यातील 220 शाळांना वर्ग 1 व 2 संवर्गातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळेतील सुविधांची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी नियोजन दिलीपकुमार बनसोडे, उपशिक्षणाध्किाारी नागराज बनसोडे, अवधूत गंजेवार यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
विशेष उपक्रम ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू
नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. बुद्धीवर्धक खेळ, प्राथमिक आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांचे ठसे घेणे, स्मरणघडी पत्रिका भरविणे आणि सामूहिक छायाचित्र काढणे हे उपक्रम विशेष आकर्षण ठरले.
प्रवेश उद्दिष्टांकडे भक्कम पावले
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 35 हजार 265 विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून,
या उपक्रमामुळे अधिकाधिक प्रवेश होण्याची सकारात्मकता दिसून येत
आहेत.
00000
No comments:
Post a Comment