Wednesday, June 4, 2025

दि. ३ जून 2025

वृत्त क्रमांक 568

जागतिक सायकलींग दिनानिमित्त 

“संडे ऑन सायकल”रॅलीस नांदेडकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद 

नांदेड दि. ३ जून :-  आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक सायकलींग दिवसानिमीत्त संडे ऑन सायकलचे आयोजन रविवार 1 जून,2025 रोजी सकाळी 7 वा. करण्यात आले होते. या रॅलीत नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 

या संडे ऑन सायकल रॅलीमध्ये सायकल चालवा निरोगी रहा, सायकल चालवा पर्यावरणास वाचवा, सायकल चालवा- शरीरातील रोग घालवा असे श्लोक म्हणत सायकल स्वारांनी नागरीकांना संदेश दिला व सायकल रॅलीस सुरुवात केली. तसेच सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल पटुना गुलाबाचे फुल व प्रत्येकांना पाण्याची बॉटल देवून त्यांचे स्वागत केले. 

ही संडे ऑन सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, चंद्रकांत गव्हाणे, विदयानंद भालेराव आदींनी सहकार्य केले.

00000



No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...