वृत्त क्रमांक 511
पशुसंवर्धन दिनानिमित्त रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
लसीकरण ३१ मे पर्यत सुरु
नांदेड दि. 19 मे : पशुसंवर्धन दिनानिमित्त उद्या 20 मे रोजी रेबीज मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्वानांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व पाळीव व भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस मोफत फक्त नोंदणी शुल्कामध्ये दिली जाणार आहे. हे लसीकरण मोहीम स्वरूपात 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. नांदेड शहरामध्ये शासकीय जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय देगलूर नाका, महानगरपालिका नांदेड संचालित पशुवैद्यकीय दवाखाना अशोक नगर नांदेड येथे, पेट नेस्ट क्लिनिक शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ, पॉज क्लिनिक श्याम टॉकीज जवळ , डॉक्टर अजेश शर्मा यांचे पेट क्लिनिक भाग्यनगर , व डॉग वर्ल्ड स्टेडियम कॉम्प्लेक्स, नांदेड येथे लस उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस टोचली जाणार आहे.
सर्व नागरिकांनी या मोहिमेचा फायदा घेऊन आपल्या श्वानाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment