Saturday, April 12, 2025

 वृत्त क्रमांक  381 

राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 एप्रिल :- जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तिन वर्षामध्ये केलेल्या कामगीरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असुन जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा-युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्यांनी पुरस्कराचे अर्ज सादर करावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असुन युवा वर्ग मोठया संख्येनेसंस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहे. युवामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणेत्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागचे शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 नुसार देण्यात येतात.

 

सन 2024-25 या वर्षात जिल्हा युवा पुरस्कार करीता जिल्हयातील युवांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा याकरीता युवक, 1 युवती व नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप युवकयुवती यांना प्रत्येकी रोख 10 हजार रुपये व संस्थेस 50 हजार रुपये तसेच गौरव पत्रसन्मान चिन्ह राहणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

प्रेस नोट_हवामान खात्याचा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 5 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 7 व 8 म...