Saturday, April 12, 2025

 वृत्त क्रमांक  382 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  

जय भीम पदयात्रेचे रविवारी आयोजन

 

नांदेड दि. 12 एप्रिल :- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेजिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल2025 रोजी आहे.   त्यानुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनजिल्हा युवा अधिकारीनेहरू युवा केंद्र यांच्या समन्वयाने जय भीम पदयात्रेचे आयोजन रविवार 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे.

 

या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयमजिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृह येथून सुरुवात होऊन आयटीएम कॉलेज-ग्लोबल हॉस्पीटल समोरुन-महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन- परत कुसुम सभागृह मार्ग- जिल्हा क्रीडा संकुलक्रीडा वसतिगृह येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

 

या पदयात्रेमध्ये नांदेड जिल्हयातील  शैक्षणीक संस्थेमधील शालेय विद्यार्थीविविध क्रीडा संघटनेचे खेळाडूएन.सी.सी.एन.वाय.के.एस.भारत स्काऊट ॲन्ड गाईडजिल्हा प्रशासन अंतर्गत विविध कार्यालयातील अधिकारीकर्मचारीविविध विभागाचे अधिकारीकर्मचारीविविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी इत्यादींच्या सहभागाने जयभीम पदयात्रा संपन्न होणार आहे.

 

त्याकरीता नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवरलोकप्रिय प्रतिनिधीसर्व विभागाचे विभागप्रमुखअधिकारी-कर्मचारीसर्व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थीखेळाडूविविध क्रीडा संघटनेचे खेळाडु मुले-मुलीप्रशिक्षक व पदाधिकारीविद्यापीठेएनजीओएनएसएसएन.वाय.के संस्थाभारत स्काऊट ॲन्ड गाईड व My Bharat Volunteers, एनसीसी व आदींनी या पदयात्रेत जास्तीतजास्त मोठया संख्येने उपस्थित राहुन सहभाग नोंदवावा व शासकीय उपक्रमांस सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनशिक्षण विभाग (प्राथ./माध्य)जिल्हा परिषद नांदेडजिल्हा युवा अधिकारीनेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

प्रेस नोट_हवामान खात्याचा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 5 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 7 व 8 म...