वृत्त क्रमांक 379
दहावी-बारावी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 12 एप्रिल :- फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून आपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रस्ताव मंगळवार 15 एप्रिल पर्यंत स्विकारण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आले होते. तथापि 10 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत 'आपले सरकार' सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार असल्याने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी सोमवार 21 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक / प्राचार्य व सर्व संबंधित घटकांनी या बाबींची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.
0000
No comments:
Post a Comment