Wednesday, March 19, 2025

 वृत्त क्रमांक 311

शनिवारी सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांची कार्यशाळा                                                                                        

नांदेड दि. 19 मार्च :  धर्मादाय आयुक्त नांदेड धर्मादाय वकील संघ, पुरोगामी धर्मादाय वकील संघ व प्रगती महिला मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांची कार्यशाळा शनिवार 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता पाचलेगावकर महाराज आश्रमासमोर मगनपुरा, आनंदनगर नांदेड येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धर्मादाय सह आयुक्त नांदेड श्रीमती हिरा का. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 

या कार्यशाळेत धर्मादाय रुग्णालयाची योजना, फेरफार अर्ज सादर करण्याबाबत कायदेशिर तरतुदी, विश्वस्तांना कर्ज घेण्याबाबतच्या कायदेशिर तरतुदी तसेच सार्वजनिक न्यासांचे लेखे ठेवण्याची पध्दत याविषयी सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांना धर्मादाय संघटनेतील अधिकारी, जेष्ठ विधीज्ञ तसेच सनदी लेखापाल मार्गदर्शन करणार आहेत. तरी संबंधितानी या कार्यशाळेस उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त हिरा का. शेळके यांनी केले आहे. 

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...