वृत्त क्रमांक 308
नांदेडकर संगीतप्रेमींसाठी 22 मार्चला वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम
वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन
नांदेड, दि १९ मार्च : चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक २२ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात येणार आहे. चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद नांदेडकरांना घेता येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेणार आहेत. संगीत संयोजन आनंदी विकास तर संवाद निरजा आपटे, देविदास फुलारी यांचा असेल ख्यातनाम गायक गायिका सागर जाधव, शेफाली कुलकर्णी, विश्वास अंबेकर, मीना सोलापूरे, आसावरी रवंदे या कलाकारांच्या कला सादरीकरणातून तसेच मुर्तिकार व्यंकट पाटील यांच्या सादरीकरणातून चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल
रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment